उत्तरपत्रिका घरातून आणा, कर्नाटक सरकारचा 'फतवा'

कर्नाटक सरकारने शालेय विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका घरातून आणण्यास सांगितले आहे. आम्ही तुम्हाला केवळ प्रश्नपत्रिका देऊ, असे सरकारने सांगितले आहे.
उत्तरपत्रिका घरातून आणा, कर्नाटक सरकारचा 'फतवा'
(प्रातिनिधिक छायाचित्र)

बंगळुरू : कर्नाटक सरकारने शालेय विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका घरातून आणण्यास सांगितले आहे. आम्ही तुम्हाला केवळ प्रश्नपत्रिका देऊ, असे सरकारने सांगितले आहे.

पाचवी, आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना कर्नाटक राज्याच्या शिक्षण विभागाने सांगितले की, आम्ही तुम्हाला केवळ प्रश्नपत्रिका पुरवू, उत्तर पत्रिका तुम्ही घरून आणावी.

कर्नाटक राज्य शिक्षण व मूल्यांकन मंडळाने सर्व शाळांच्या हेडमास्टरना नवीन नियमांची माहिती देऊन विद्यार्थ्यांना कळवण्यास सांगितले आहे.

कर्नाटक सरकारच्या या निर्णयावर शिक्षकांसह, पालकांनी टीका केली असून विरोधकांनीही हल्लाबोल केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in