कर्नाटक भाजपच्या हातून निसटले; काँग्रेसचा ऐतिहासिक विजय

निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजप पक्षाचा धुव्वा उडाला असून, राज्यात काँग्रेसचे पूर्ण बहुमताचे सरकार येणार आहे.
कर्नाटक भाजपच्या हातून निसटले; काँग्रेसचा ऐतिहासिक विजय

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल समोर आले आहेत. निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजप पक्षाचा धुव्वा उडाला असून, राज्यात काँग्रेसचे पूर्ण बहुमताचे सरकार येणार आहे. निवडणुकीपूर्वी भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. परंतु कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या आजच्या निकालाकडे फक्त एका राज्याचा निकाल म्हणून आता बघितले जाणार नसून या कर्नाटक निवडणुकीत भाजपने आणि पंतप्रधान मोदींनी पूर्ण ताकद लावली होती.

काँग्रेस आणि भाजपसाठी कर्नाटकची निवडणूक अतिशय महत्त्वाची होती. २०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकमध्ये कोणाची सत्ता येणार? यावरून निवडणूक चर्चेत होती. या पराभवाने भाजपच्या मिशन दक्षिणला जोरदार झटका बसला आहे. दक्षिणेत भाजपची फक्त कर्नाटकमध्येच सत्ता होती. या पराभवामुळे ते राज्यही भाजपच्या हातून निसटले आहे. या वर्षी तेलंगणमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. पण कर्नाटमधील पराभवाने भाजपला मोठा झटका बसला आहे.

देशात अनेक राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे. पण दक्षिणेत मात्र भाजपचा हा विजय रथ येऊन थांबतो. कर्नाटक असे राज्य होते जे जिंकून भाजप अधिक शक्तीने तेलंगण निवडणुकीच्या मैदानात उतरली असती. तेलंगणमध्ये यावेळी सामना केसीआर यांच्या बीआरएसशी आहे. पण कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय झाल्याने भाजपच्या पुढील वाटचालीला मोठा झटका बसला आहे. या वर्षी ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. कर्नाटकमधील पराभवानंतर काँग्रेसला भाजवर निशाणा साधल्याची संधी मिळाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in