मिठी, चुंबन अन्... : शैक्षणिक सहलीत गुरु-शिष्याच्या नात्याला कलंक, 'रासलीला' करणाऱ्या शिक्षिकेवर झाली कारवाई

शिक्षिकेने तिच्या मोबाईलमधून मूळ फोटो आणि व्हिडिओ काढून टाकले असून हटवलेल्या फाईल्स परत मिळवण्याच्या प्रयत्नात शिक्षण विभाग आहे.....
मिठी, चुंबन अन्... : शैक्षणिक सहलीत गुरु-शिष्याच्या नात्याला कलंक,  'रासलीला' करणाऱ्या शिक्षिकेवर झाली कारवाई

गुरु-शिष्याच्या नात्याला एक अनन्य साधारण असे महत्त्व आहे. हे नाते अत्यंत पवित्र मानले जाते. मात्र, गुरु शिष्याच्या नात्याला तिलांजली देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एका शिक्षिकेचे विद्यार्थ्यासोबत शैक्षणिक सहलीदरम्यानचे रोमँटिक फोटो व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडताच त्या शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे.

माहितीनुसार, 42 वर्षांची शिक्षिका कर्नाटकातील मुरुगमल्ला चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील असल्याचे समजते. तर, विद्यार्थी हा 10 वीच्या वर्गातील आहे. 22 ते 25 डिसेंबर दरम्यान एका अभ्यास दौऱ्यावर असतानाचे हे फोटोशूट होते. फोटो व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थ्याच्या पालकांनी गटशिक्षण अधिकाऱ्याकडे(BEO) तक्रार दाखल करत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर BEO उमादेवी यांनी शाळेला भेट देऊन सहलीला गेलेले विद्यार्थी, कर्मचारी आणि शिक्षकांची चौकशी केल्यानंतर शिक्षिकेला निलंबित केले आहे.

सहलीचा भाग असलेल्या दुसऱ्या विद्यार्थ्याने फोटो आणि व्हिडिओ शूट केल्याचे सांगण्यात येत आहे. या सहलीचा भाग असलेल्या इतर शिक्षकांना याबाबतची कल्पना नव्हती, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. शिक्षिकेने तिच्या मोबाईलमधून मूळ फोटो आणि व्हिडिओ काढून टाकले असून हटवलेल्या फाईल्स परत मिळवण्याच्या प्रयत्नात शिक्षण विभाग आहे, असेही सांगण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in