बेकायदेशीर व्यवहार आणि बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी कार्ती चिदंबरम पुन्हा एकदा अडचणीत

 बेकायदेशीर व्यवहार आणि बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी कार्ती चिदंबरम पुन्हा एकदा अडचणीत

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. बेकायदेशीर व्यवहार आणि बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मंगळवारी सकाळी ६ वाजता कार्ती यांच्या ११ ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले आहेत.

२०१०-१४ दरम्यान झालेल्या कथित विदेशी व्यवहारासंदर्भात तपास संस्थेने कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात नवीन गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार हे छापे टाकण्यात आले आहेत. कार्ती चिदंबरम यांची अनेक प्रकरणांमध्ये चौकशी केली जात आहे, ज्यात आयएनएक्स मीडियाने विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या मंजुरीने परदेशातून ३०५ कोटी रुपये मिळवल्याच्या प्रकरणाचा समावेश आहे. त्यावेळी त्यांचे वडील पी. चिदंबरम देशाचे अर्थमंत्री होते. कार्ती चिदंबरम यांनी या छाप्यांवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘आता मी मोजणी थांबवली आहे. हे किती वेळा घडले? याचीही नोंद व्हायला हवी.’ असे त्यांनी ट्विट केले आहे.

२५० चिनी लोकांना

व्हिसा दिल्याचा आरोप

कार्ती चिदंबरम यांनी चुकीच्या पद्धतीने पैसे घेऊन २५० चिनी लोकांना व्हिसा दिल्याचा आरोप आहे. हे प्रकरण पंजाबमधील एका वीज प्रकल्पाशी संबंधित आहे, ज्यामध्ये व्हिसा जारी करण्यात आला होता. याप्रकरणी सीबीआयने नवा गुन्हा दाखल केला आहे. चेन्नई, मुंबई, तामिळनाडू, पंजाब, ओडिशा अशा एकूण ११ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in