Pahalgam Terror Attack : काश्मीरमधील ४८ पर्यटन स्थळे बंद

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता जम्मू-काश्मीर सरकारने एक मोठा निर्णय घेत पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव काश्मीर खोऱ्यातील संवेदनशील भागातील ४८ पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद केली आहेत.
Pahalgam Terror Attack : काश्मीरमधील ४८ पर्यटन स्थळे बंद
Published on

श्रीनगर : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता जम्मू-काश्मीर सरकारने एक मोठा निर्णय घेत पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव काश्मीर खोऱ्यातील संवेदनशील भागातील ४८ पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद केली आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मंगळवारी देण्यात आली. दरम्यान, बंद करण्यात आलेल्या ४८ पर्यटन स्थळांमध्ये आणि ट्रेकिंग ट्रेल्समध्ये गुरेझ व्हॅली, दूधपथरी, वेरीनाग, बंगस व्हॅली आणि युसमार्ग यासारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांचा समावेश आहे. या संदर्भात एका अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले की, पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात २५ पर्यटक आणि एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ही पर्यटन स्थळे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ज्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था आहे अशी पर्यटन स्थळे खुली ठेवण्यात आली आहेत.

जामिया मशीद भेटीला मनाई

बंद करण्यात आलेल्या पर्यटनाच्या ठिकाणांपैकी एक असलेले गुरेझ ही बांदीपोरा जिल्ह्यातील नियंत्रणरेषेवरील एक दरी आहे. हे ठिकाणही पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय मानले जाते. तसेच दूधपथरी, कुपवाडा येथील बंगस व्हॅली आणि अनंतनाग येथील वेरीनाग, शोपियां येथील उंचावरील कौसरनाग तलाव, कौसरनाग ही ठिकाणेही पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत. याबरोबरच उरी येथील कमान चौकी हे ठिकाणही बंद करण्यात आले आहे. याबरोबरच श्रीनगर शहरात मध्यभागी असलेल्या जामिया मशिदीला भेट देण्याची परवानगी देखील न देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

  1. Kashmir Tourist Sites Closed

  2. Pahalgam Terror Attack Impact

  3. Jammu Kashmir Travel Ban 2025

  4. Gurez Valley Closed for Tourists

  5. Safety Measures in Kashmir

  6. Jamia Masjid Ban for Visitors

  7. Trekking Banned in Kashmir

  8. Doodhpathri Tourism Halted

  9. Tourism Suspension Kashmir 2025

  10. Anantnag Verinag Travel Advisory

logo
marathi.freepressjournal.in