Kashmir : पुलवामात दहशतवादी हल्ला; काश्मिरी पंडितावार गोळीबार
@ANI

Kashmir : पुलवामात दहशतवादी हल्ला; काश्मिरी पंडितावार गोळीबार

जम्मू काश्मीरमधील (Kashmir) दहशतवाद्यांनी केलेला गोळीबाराची गेल्या आठवड्याभरातील दुसरी घटना

काश्मीर (Kashmir) खोऱ्यातील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडितांची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीर पंडित असलेले संजय शर्मा यांच्यावर काही दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. संजय शर्मांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात दहशत पसरली आहे.

संजय शर्मा हे सजली काही कामानिमित्त बाजारामध्ये जात होते. यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केले. पण, त्याचा मृत्यू झाला. यानंतर आता स्थानिक पोलीस आणि सुरक्षा दल दहशतवाद्यांचा शोध सुरु असून परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in