कठुआमध्ये ३ ठिकाणी ढगफुटी; ७ जणांचा मृत्यू

रविवारी सकाळी जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पुन्हा ढगफुटी झाली. गेल्या ३ दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटीची ही दुसरी घटना आहे. रविवारी कठुआ जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या परिसरात ३ ठिकाणी ढगफुटी झाली. यामुळे जोद व्हॅली परिसरात ७ जणांचा मृत्यू झाला, तर ६ जण जखमी झाले.
कठुआमध्ये ३ ठिकाणी ढगफुटी; ७ जणांचा मृत्यू
Published on

जम्मू : रविवारी सकाळी जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पुन्हा ढगफुटी झाली. गेल्या ३ दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटीची ही दुसरी घटना आहे. रविवारी (दि.१८) कठुआ जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या परिसरात ३ ठिकाणी ढगफुटी झाली. यामुळे जोद व्हॅली परिसरात ७ जणांचा मृत्यू झाला, तर ६ जण जखमी झाले.

जोद व्हॅली व्यतिरिक्त, माथेर चक, बगारड-चांगडा आणि दिलवान-हुटली येथेही भूस्खलन झाले. भूस्खलनानंतर जोद गाव शहरापासून तुटले होते, बऱ्याच प्रयत्नांनंतर बचाव पथक गावात पोहोचू शकले. घरे अनेक फूट उंचीपर्यंत पाण्याने आणि ढिगाऱ्याने भरली आहेत. या दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भूस्खलनात २ ते ३ घरांचे नुकसान झाले, तर ६ लोक अडकल्याची माहिती प्राप्त झाली आहे. जंगलोटसह राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याचे नुकसान झाले आहे. रेल्वे ट्रॅकदेखील विस्कळीत झाला आहे.

हिमाचल प्रदेशातही रविवारी पहाटे ४ वाजता कुल्लूच्या टाकोली येथे ढगफुटी झाली. कुल्लूच्या पनारसा आणि नागवाई येथे अचानक आलेल्या पुरानंतर सर्वत्र कचरा पसरला आहे. दरम्यान, १४ ऑगस्टला जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडच्या चशोटी येथील ढगफुटीच्या घटनेत ६५ जणांचा मृत्यू झाला होता.

logo
marathi.freepressjournal.in