कविता यांची अरविंद फार्माच्या प्रवर्तकांना धमकी; सीबीआयचा न्यायालयात आरोप

रेड्डी हे मद्य धोरण घोटाळा मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी होते, मात्र आता ते माफीचा साक्षीदार आहेत. सीबीआयने त्यांच्याविरुद्ध अद्याप आरोपपत्र दाखल केलेले नाही.
कविता यांची अरविंद फार्माच्या प्रवर्तकांना धमकी; सीबीआयचा न्यायालयात आरोप

नवी दिल्ली : भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्या के. कविता यांनी अरविंद फार्माचे प्रवर्तक शरद चंद्र रेड्डी यांना आम आदमी पार्टीला (आप) २५ कोटी रुपये देण्याची धमकी दिली, असे सीबीआयच्या वतीने शनिवारी विशेष न्यायालयात सांगण्यात आले. दिल्ली सरकारच्या मद्य धोरणानुसार अरविंद फार्माला पाच किरकोळ विक्री केंद्रे देण्यात आली होती.

जर तुम्ही आपला पैसे दिले नाहीत तर त्याचा तेलंगणा आणि दिल्लीतील व्यापारावर विपरीत परिणाम होईल, असे कविता यांनी रेड्डी यांना बजावल्याचे सीबीआयने म्हटले आहे. रेड्डी हे मद्य धोरण घोटाळा मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी होते, मात्र आता ते माफीचा साक्षीदार आहेत. सीबीआयने त्यांच्याविरुद्ध अद्याप आरोपपत्र दाखल केलेले नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in