
काही लोक एसी १७ किंवा १८ वर ठेवतात. त्यानंतर अंगावर ब्लँकेट घेतात. त्याऐवजी एसी २४ अंशावर ठेवल्यास वीजेची बचत होऊ शकते, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त राष्ट्र सरचिटणीस एंटोनियो गुटेरेस यांनी केवडिया येते ‘मिशन लाईफ’ची सुरुवात केली. त्यावर मोदी यांनी छोट्या छोट्या गोष्टी ‘मिशन लाईफ’साठी महत्वपूर्ण ठरत असल्याचे सांगितले. एसी १७ किंवा १८ वर ठेवल्याने पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे तो २४ अंशांवर ठेवावा. तसेच कारमधून जिमला जाणाऱ्या लोकांनी चालत जावे. त्यामुळे आरोग्य सुधारेल तसेच इंधन व ऊर्जेची बचत होईल, असे ते म्हणाले.
पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली ‘मिशन लाईफ’ हे वैश्विक आंदोलन बनू शकते. पर्यावरणाची सुरक्षा व संरक्षणासाठी वैयक्तीक व सामूहिक प्रयत्न केले जातील. वातावरण बदलाचे परिणाम दिसत आहेत. ग्लेशियर विरघळत असून समुद्राचे पाणी वाढत आहे.