ईडीला न जुमानता केजरीवाल यांचे मध्य प्रदेशला प्रयाण

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सध्या दिल्ली मद्यविक्री घोटाळा प्रकरणात तुरुंगात आहेत.
ईडीला न जुमानता केजरीवाल यांचे मध्य प्रदेशला प्रयाण

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी ईडीला न जुमानता मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणूक प्रचारासाठी गुरुवारी प्रयाण केले. ईडील म्हणजे सक्तवसुली संचालनालयाने त्यांना हजर होण्यासाठी समन्स बजावले होते. केजरीवाल यांनी हे समन्स बेकायदेशीर व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगून ते रद्द करावे, अशी मागणी देखील केली.

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सध्या दिल्ली मद्यविक्री घोटाळा प्रकरणात तुरुंगात आहेत. याच प्रकरणात पुढील तपासासाठी केजरीवाल यांना र्इडीने समन्स बजावले होते, पण केजरीवाल पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांच्यासोबत मध्य प्रदेशात निवडणूक प्रचार करण्यासाठी निघून गेले. मात्र र्इडीने दिल्ली मद्यविक्री घोटाळ्यात आम आदमी पक्षालाच आरोपी केल्यामुळे त्यात अरविंद केजरीवाल यांचा समावेश आहे. मात्र भारतीच जनता पक्षाने ईडीला हाताशी धरून चार राज्यांत प्रचार करण्यापासून आपणास रोखण्यासाठीच ही नोटीस बजावली असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. तशा आशयाचे पत्रच केजरीवाल यांनी ईडी संचालकांना लिहिले आहे.

logo
marathi.freepressjournal.in