अर्थसंकल्पास विलंबाबद्दल केजरीवाल यांना समज; नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांचे पत्र

दिल्ली सरकारचे अर्थसंकल्पी अधिवेशन १५ फेब्रुवारीपासून सुरू झाले. ते २१ फेब्रुवारीला संपणार होते.
अर्थसंकल्पास विलंबाबद्दल केजरीवाल यांना समज; नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांचे पत्र

नवी दिल्ली : दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी शनिवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून विधानसभेत अर्थसंकल्प सादरीकरणाची थांबलेली प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याबाबत समज दिली.

दिल्ली सरकारचे अर्थसंकल्पी अधिवेशन १५ फेब्रुवारीपासून सुरू झाले. ते २१ फेब्रुवारीला संपणार होते. मात्र, आता त्याची मदत वाढून मार्चच्या पहिल्या आठवड्यात संपण्याची चिन्हे आहेत. त्याबद्दल नायब राज्यपालांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून विचारणा केली आहे. त्यावर दिल्ली सरकारने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अर्थमंत्री अतिशी यांनी २० फेब्रुवारीच्या सुमारास राष्ट्रपतींच्या मान्यतेसह अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प मंजुरीसाठी नायब राज्यपाल कार्यालयाकडे पाठवला जातच होता. पण हा एक महत्त्वाचा सरकारी दस्तावेज असल्याने तो हाताळताना सूक्ष पातळीवर काळजी घेणे आवश्यक होते. त्याला गृह मंत्रालयाची मंजुरी मिळण्यास काही काळ गेला. त्यामुळे अर्थसंकल्प नायब राज्यपाल कार्यालयाकडे पाठवण्यास विलंब झाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in