नवी दिल्ली : कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ‘ईडी’ने सातव्यांदा समन्स जारी केले होते. त्यांना सोमवारी चौकशीसाठी बोलवले होते. मात्र त्यांनी सातव्यांदा ‘ईडी’ चौकशीला दांडी मारली आहे.
माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेला वर्ष झाल्याप्रकरणी केजरीवाल यांनी आपल्या सर्व मंत्र्यांसह राजघाटाला भेट दिली. मला पाठवलेले ‘ईडी’चे समन्स हे ‘इंडिया’ आघाडीवर दबावासाठी वापरले जात आहे. आम्ही ‘काँग्रेस’सोबतची आघाडी मोडणार नाही, असे ‘आप’ने सांगितले. ‘आप’ने काँग्रेससोबत दिल्ली, हरियाणा व गुजरातमध्ये जागा वाटप केले आहे. केजरीवाल यांनी समन्सला दांडी मारल्याप्रकरणी ‘ईडी’ने सत्र न्यायालयात धाव घेतली.
दरम्यान, केजरीवाल व त्यांच्या पक्षाने ‘ईडी’चे समन्स अवैध असल्याचा आरोप केला. आमची आघाडी तोडण्याचा त्यांचा डाव आहे. त्यांनी अनेकवेळा आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे इशारे दिले आहेत.