केरळ हायकोर्टाची प्रियांका गांधींना नोटीस; वायनाडमधील विजयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मागितले उत्तर

केरळ उच्च न्यायालयाने बुधवारी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांना नोटीस बजावली असून वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत त्यांच्या विजयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर कोर्टाने उत्तर मागितले आहे.
केरळ हायकोर्टाची प्रियांका गांधींना नोटीस; वायनाडमधील विजयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मागितले उत्तर
(संग्रहित छायाचित्र)
Published on

कोची : केरळ उच्च न्यायालयाने बुधवारी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांना नोटीस बजावली असून वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत त्यांच्या विजयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर कोर्टाने उत्तर मागितले आहे.

भाजप नेत्या नव्या हरिदास यांनी याबाबत याचिका दाखल केली आहे. त्यांनी वायनाड मतदारसंघातून प्रियांका गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. प्रियांकांनी उमेदवारी अर्जात त्यांच्या आणि कुटुंबाच्या मालमत्तेबद्दल योग्य माहिती दिली नाही, असा आरोप हरिदास यांनी केला आहे.

प्रियांकांनी जाणूनबुजून आपली मालमत्ता लपवली जेणेकरून निवडणूक निकालांवर परिणाम होऊ शकेल. प्रियांकांनी चुकीची माहिती देऊन आचारसंहितेचेही उल्लंघन केले आहे, असाही दावा हरिदास यांनी केला आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी ऑगस्टमध्ये होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in