Kerala Jeep Accident : केरळच्या वायनाडमध्ये जीप दरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू

केरळच्या वायनाड जिल्ह्यातील वल्लाड- मानंथवाडी रस्त्यावर हा अपघात झाला असून या जीपमध्ये १२ जण प्रवास करत होते
Kerala Jeep Accident : केरळच्या वायनाडमध्ये जीप दरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू

केरळच्या वायनाडमध्ये आज (२५ ऑगस्ट) एक मोठी दुर्घटना घडली. केरळच्या वायनाड जिल्ह्यात प्रवाशांनी भरलेल्या जीपचा भीषण अपघात झाला असून यात नऊ जणांना

आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये सर्वाधीक महिला असल्याचं सांगितलं जात आहे. आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. केरळच्या वायनाड जिल्ह्यातील वल्लाड- मानंथवाडी रस्त्यावर हा अपघात झाला आहे. या जीपमध्ये १२ जण प्रवास करत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळच्या वायनाड जिल्ह्यातील वल्लाड-मानंथवाडी रस्त्यावर हा अपघात झाला असून या जीपमध्ये प्रवास करणाऱ्या १२ पैकी ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वायनाड हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा मतदारसंघ आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, वायनाडच्या मानंथवाडी येथे झालेल्या जीप दुर्घटनेने मला खुप दु:ख झालं आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांना तात्ताळ पावले उचलायला सांगितलं. शोकाकुल कुटुंबासोबत माझे विचार आहेत. मी जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं म्हणून प्रार्थना करतो.

एका स्थानिक रहिवाशाने दिलेल्या माहितीनुसार, जीप एका खासगी जहाच्या बागेत काम करणाऱ्या महिलांना घेऊन मक्कीमालाला परतत होती. यावेळी हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्यांना मानंथवाडी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यातील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in