कॅनडातील हिंदू मंदिरात खलिस्तानी पोस्टर्स

जानेवारीत ब्रॅम्प्टन येथील हिंदू मंदिरातही अशीच घटना घडली होती
कॅनडातील हिंदू मंदिरात खलिस्तानी पोस्टर्स

नवी दिल्ली : कॅनडातील आणखी एका मंदिरावर खलिस्तान समर्थक पोस्टर्स झळकवल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. शनिवारी रात्री उशीरा हा प्रकार घडला असून ऑस्ट्रेलिया टुडे नावाच्या नियतकालीकात याविषयीचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील हिंदू मंदिरावर शनिवारी खलिस्तान समर्थकांनी पोस्टर्स लावली. स्वतंत्र खलिस्तानसाठी भारतात सार्वमत घेण्यात यावे, अशा आशयाचा मजकूर त्या पोस्टर्सवर छापला आहे. ऑस्ट्रेलिया टुडेने यासंबंधी वृत्त देऊन काही छायाचित्रे शेअर केली आहेत. खलिस्तान टायगर फोर्सचा म्होरक्या आणि दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची जून महिन्यात हत्या झाली होती. त्या प्रकरणात भारताची काय भूमिका आहे, याचा कॅनडाने तपास करावा, असा मजकूरही या पोस्टर्सवर आहे.

गेल्या काही दिवसांत कॅनडात हिंदू मंदिरांमध्ये अशा घटना वाढीस लागल्या आहेत. एप्रिल महिन्यात ओंटारिओतील विंडसर येथे स्वामीनारायण मंदिरात अशीच घटना घडली होती. फेब्रुवारीस मिसिसॉगातील राम मंदिरातही खलिस्तानी पोस्टर्स दिसली होती. जानेवारीत ब्रॅम्प्टन येथील हिंदू मंदिरातही अशीच घटना घडली होती.

logo
marathi.freepressjournal.in