पैशासाठी केली आपल्याच कन्येची हत्या; भावाच्या तक्रारीवरून आई-वडिलांना अटक

किशोरवयीन मुलीने तिच्या बँक खात्यातून पैसे देण्यास नकार दिल्याने तिची हत्या केल्यावरून अटक करण्यात आली, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
पैशासाठी केली आपल्याच कन्येची हत्या; भावाच्या तक्रारीवरून आई-वडिलांना अटक

रामगड : झारखंडच्या रामगढ जिल्ह्यात एका जोडप्याला त्यांच्या किशोरवयीन मुलीने तिच्या बँक खात्यातून पैसे देण्यास नकार दिल्याने तिची हत्या केल्यावरून अटक करण्यात आली, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

१३ जानेवारी रोजी खुशी कुमारी (१७) ही मुलगी तिच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत सापडली होती. खुशी कुमारीच्या भावाने भदाणीनगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. तिने पैसे देण्यास नकार दिल्याने वडिलांनी आणि सावत्र आईने आपल्या बहिणीची हत्या करून तिचा मृतदेह लटकवल्याचा आरोप भावाने केला होता. तिची मुदत ठेव आई वडिलांना हवी होती. त्यावरून हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला आहे, असे पोलिसांनी मंगळवारी सांगितले.

खुशीच्या एका बँकेत ६ लाख रुपये मुदत ठेव होते, जी मॅच्युअर होणार होती. उपविभागीय पोलीस अधिकारी बिरेंद्र कुमार चौधरी यांनी सांगितले की, पोलिसांनी सुनील महतो आणि त्यांची पत्नी पुनम देवी यांना मुलीच्या मृत्यूप्रकरणी अटक केली आहे. पीडितेच्या भावाने एफआयआर दाखल केल्यानंतर त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in