वैचारिक नक्षलवादी ही टीका विरोधी नेत्यांबाबत नाही - किरेन रिजिजू

पंतप्रधानांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना ‘दिमागी नक्षल’ अर्थात वैचारिक नक्षलवादी मानसिकतेचे लोक म्हटलेले नाही, असा दावा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी केला.
वैचारिक नक्षलवादी ही टीका विरोधी नेत्यांबाबत नाही - किरेन रिजिजू
वैचारिक नक्षलवादी ही टीका विरोधी नेत्यांबाबत नाही - किरेन रिजिजू (संग्रहित छायाचित्र)
Published on

नवी दिल्लीः पंतप्रधानांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना ‘दिमागी नक्षल’ अर्थात वैचारिक नक्षलवादी मानसिकतेचे लोक म्हटलेले नाही, असा दावा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी केला. विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात ‘माओवादी मानसिकते’ संबंधी केलेल्या वक्तव्यावर केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिले.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टमध्ये रिजिजू यांनी पंतप्रधान मोदी यांना नेसक्या कोणाचा उल्लेख अभिप्रेत होता याची यादी दिली. ते म्हणाले की,

"दिमागी नक्षलवादी म्हणजे केवळ ते लोक—

१. जे माओवाद्यांना पाठिंबा देतात आणि भारतीय संविधान नाकारतात.

२. जे फुटीरतावाद्यांच्या बाजूने उभे राहतात आणि कलम ३७० ला पाठिंबा देतात.

३. जे ईशान्य भारताला देशापासून वेगळे करण्यासाठी ‘चिकन नेक’ (सिलीगुडी कॉरिडॉर) तोडण्याची इच्छा बाळगतात,”

शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘दिमागी नक्षलवाद्यांना’ ओळखून त्यांना समाजापासून वेगळे करण्याची गरज असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती.

दरम्यान, रविवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाचा संदर्भ देत ‘एक्स’वरील पोस्टमध्ये “मला दिमागी नक्षल असल्याचा अभिमान आहे,” असे उपरोधिकपणे म्हटले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in