

कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या 'बनावट स्वाक्षरी' प्रकरणात सीआयडीने मोठी कारवाई केली आहे. मंगळवारी दुपारी सीआयडीच्या पथकाने तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कालिघाट येथील निवासस्थानी आणि पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात धडक दिली. या कारवाईपूर्वी सुरक्षा कर्मचारी आणि पक्षाच्या नेत्यांशी सीआयडीचा काही काळ वादही झाला.
विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीच्या प्रस्तावावर टीएमसी आमदारांच्या स्वाक्षऱ्या बनावट असल्याचा आरोप आहे. या प्रकरणावरून पक्षात मोठी फूट पडली असून, सीआयडी या प्रकरणाचा तपास करत आहे.
सीआयडीच्या सूत्रांनुसार, टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी सीआयडीच्या नोटीसला दिलेल्या उत्तरात नमूद केले होते की, आमदारांच्या स्वाक्षऱ्या कालिघाट येथील ३०बी हरीश चटर्जी स्ट्रीटवरील पक्षाच्या कार्यालयात गोळा करण्यात आल्या होत्या. याच माहितीच्या आधारे सीआयडीचे पथक तिथे पोहोचले.