Kolkata : कल्याण बॅनर्जींनीही ममतांची सोडली साथ

तृणमूल काँग्रेसमधील कलह आणखी वाढू लागला असून अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात बंड पुकारणाऱ्यांची संख्या वाढते आहे.
Kolkata : कल्याण बॅनर्जींनीही ममतांची सोडली साथ
Kolkata : कल्याण बॅनर्जींनीही ममतांची सोडली साथ
Published on

कोलकाता : तृणमूल काँग्रेसमधील कलह आणखी वाढू लागला असून अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात बंड पुकारणाऱ्यांची संख्या वाढते आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार कल्याण बॅनर्जी यांनी गुरुवारी पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांना थेट अल्टिमेटम दिला आहे. ‘माझ्यात आणि पुतण्या अभिषेक बॅनर्जीमध्ये कोणा एकाची निवड करा,’ असे आव्हान देत कल्याण बॅनर्जी यांनी अभिषेक हे ‘अहंकारी’ आणि ‘अस्थिर मानसिकतेचा’ असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

यापुढे अभिषेक बॅनर्जी यांच्याशी संबंधित कोणत्याही कायदेशीर बाबी किंवा न्यायालयीन याचिकांमध्ये आपण प्रतिनिधित्व करणार नाही मात्र, तृणमूल काँग्रेस पक्षाशी संबंधित खटले लढवणे सुरूच ठेवू, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सीआयडीच्या स्वाक्षरी बनावट प्रकरणाच्या चौकशीत कल्याण बॅनर्जी हे कलकत्ता उच्च न्यायालयात अभिषेक बॅनर्जी यांची बाजू मांडत होते. मात्र, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील निवासस्थानावरील टीएमसी कार्यालय आणि अभिषेक यांच्या कॅमॅक स्ट्रीटवरील कार्यालयावर पडलेल्या सीआयडीच्या छाप्यांविरोधात डायमंड हार्बरचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी स्वतंत्र रिट याचिका दाखल केल्याची माहिती कल्याण बॅनर्जी यांना मिळाली. येथूनच दोन्ही नेत्यांमधील वाद टोकाला पोहोचला.

Kolkata : कल्याण बॅनर्जींनीही ममतांची सोडली साथ
तृणमूलमध्ये फूट ; ८० पैकी ५० आमदार ममतांच्या विरोधात? बंगालमध्ये महाराष्ट्र पॅटर्न, बंडखोरांचा पक्षचिन्हावरही दावा

आणखी एक राजीनामा

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसला गुरुवारी आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे राज्यसभेतील खासदार प्रकाश चिक बडाईक यांनी गुरुवारी त्यांच्या खासदारकीचा आणि पक्षाचा राजीनामा दिला. पश्चिम बंगालमधील जनतेने भाजपला दिलेल्या कौलाचा आदर करत आपण हा निर्णय घेतल्याचे बडाईक यांनी स्पष्ट केले आहे. सुखेंदू शेखर रॉय आणि सुस्मिता देव यांच्यानंतर या आठवड्यात राजीनामा देणारे बडाईक हे तृणमूलचे तिसरे खासदार ठरले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in