Video : आत्महत्येसाठी पुलावर चढला, पोलिसांनी बिर्याणी अन् नोकरीचे आमिष देत उतरवले खाली

पत्नीपासून विभक्त झाल्यामुळे उद्भवलेल्या मानसिक त्रासातून आणि व्यवसाय ठप्प झाल्याने आर्थिक अडचणीमुळे उचलले होते टोकाचे पाऊल...
Video : आत्महत्येसाठी पुलावर चढला, पोलिसांनी बिर्याणी अन् नोकरीचे आमिष देत उतरवले खाली

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामधून एक विचित्र घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यासाठी एक 40 वर्षीय माणूस पुलावर चढला आणि उडी मारण्याची धमकी देऊ लागला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्याला आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी पोलिसांनी बराच प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. अखेर पोलिसांनी त्याला नोकरी आणि बिर्याणीची ऑफर दिली तेव्हा कुठे तो माणूस खांबावरून खाली आला आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

कराया स्टेशनच्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, 23 जानेवारी रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास एक माणूस त्याच्या मोठ्या मुलीला घेऊन दुचाकीवरून सायन्स सिटी येथे जात होता. अचानक त्याने दुचाकी थांबवली. मोबाईल रस्त्यात पडल्यामुळे तो शोधायला जातो, असे मुलीला सांगून तो निघाला. मुलीला रस्त्यातच उभे करून तो थेट पुलावर चढला आणि उडी मारण्याची धमकी देऊ लागला.

जवळच्या पोलिस स्टेशनमधील पोलिसांसह कोलकाता पोलिस डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुप (DMG) आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचारी त्वरीत घटनास्थळी पोहोचले आणि त्याला सामजावण्याचा प्रयत्न करू लागले. काही उपयोग होत नव्हता. अखेर पोलिसांनी त्याच्या मुलीशी बोलून सर्व परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर पोलिसांनी त्याला बिर्याणी आणि रोजगाराची ऑफर दिली, तेव्हा कुठे तो खाली उतरला. पत्नीपासून विभक्त झाल्यामुळे उद्भवलेल्या मानसिक त्रासातून आणि व्यवसाय ठप्प झाल्याने आर्थिक अडचणीमुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले होते.

तो माणूस पाय घसरून पडल्यास विजेच्या खांबावर आदळेल किंवा खाली रेल्वे रुळांवर पडेल, अशी भीती पोलिसांना वाटत होती. दरम्यान, या सर्व हाय व्होल्टेज ड्रामामुळे रस्त्यावर जवळपास अर्धातास वाहतूककोंडी झाली होती.

logo
marathi.freepressjournal.in