
कोलकाता : कोलकाता हायकोर्टात शुक्रवारी आर. जी. कर रुग्णालय बलात्कार-हत्या प्रकरणाशी संबंधित खटल्याची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारची याचिका फेटाळून लावली आणि सीबीआयची याचिका स्वीकारली.
कनिष्ठ न्यायालयाने दोषी संजय रॉयला दिलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेला दोघांनीही आव्हान दिले होते. दोन्ही याचिकांमध्ये संजयला मृत्युदंडाची मागणी करण्यात आली होती. न्या. देबांग्सु बसक आणि मोहम्मद सब्बर रशिदी यांच्या खंडपीठाने बंगाल सरकारला सांगितले की, राज्य सरकारला मृत्युदंडाची मागणी करण्याचा कोणताही अधिकार नाही. न्यायालयाने सीबीआयच्या बाजूने निकाल देत म्हटले की, तीच खटला चालवणारी संस्था असल्याने तिला शिक्षेला आव्हान देण्याचा अधिकार आहे.
सियालदाह न्यायालयाने २० जानेवारी रोजी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याप्रकरणी २७ जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीनंतर कोलकाता उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.