CRPF च्या चौकीवरील हल्ला : चौकशीसाठी अनेक संशयित ताब्यात

Kulgam CRPF Checkpost Attack : दक्षिण काश्मीरमधील कुलगाम येथे सीआरपीएफच्या चौकीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी सुरक्षा दलांनी अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.
CRPF च्या चौकीवरील हल्ला : चौकशीसाठी अनेक संशयित ताब्यात
CRPF च्या चौकीवरील हल्ला : चौकशीसाठी अनेक संशयित ताब्यात
Published on: 

श्रीनगर : दक्षिण काश्मीरमधील कुलगाम येथे सीआरपीएफच्या चौकीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी सुरक्षा दलांनी अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.

बुधवारी दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या चौकीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यानतंर तात्काळ दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी परिसरात व्यापक नाकाबंदी आणि शोध मोहीम राबवली.ही शोध मोहीम शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही सुरूच होती. सुरक्षा दलांनी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बॅरिकेड्स आणि चिलखती वाहने तैनात केली आहेत. कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून सुरक्षा तपासणी नाक्यांवर वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

CRPF च्या चौकीवरील हल्ला : चौकशीसाठी अनेक संशयित ताब्यात
सुरक्षा दलाच्या चौकीवर दहशतवाद्यांचा गोळीबार; CRPF चे तीन जवान जखमी

या मोहिमेसाठी सुरक्षा यंत्रणा मानवी आणि तांत्रिक माहितीचा वापर करत आहेत. या अनुषंगाने पोलिसांनी अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हल्ल्याच्या ठिकाणाला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. या घटनेनंतर श्रीनगर शहरासह काश्मीर खोऱ्यातील इतर जिल्ह्यांमध्येही सुरक्षा वाढवण्यात आली असून, पोलीस आणि निमलष्करी दलाकडून वाहनांची अचानक तपासणी केली जात आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)