Video : कुनो नॅशनल पार्कमध्ये पुन्हा पाळणा हलला! 'आशा'ने दिला तीन बछड्यांना जन्म

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी या तिन्ही बछड्यांचा व्हिडिओ शेअर करत याबाबातची माहिती दिली आहे.
Video : कुनो नॅशनल पार्कमध्ये पुन्हा पाळणा हलला! 'आशा'ने दिला तीन बछड्यांना जन्म

मध्यप्रदेशातील 'कुनो नॅशनल पार्क'मधील सरकारच्या चित्ता संवर्धनाच्या आशा पल्लवित करणारी बातमी समोर आली आहे. या प्रकल्पातील 'आशा' या मादी चित्त्याने तीन बछड्यांना जन्म दिला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी या तिन्ही बछड्यांचा व्हिडिओ शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.

"जंगलात गुरगुरनं ऐकू आलंय! कुनो नॅशनल पार्कमध्ये तीन नवीन सदस्यांचे आगमन झालंय, हे सांगताना आनंद होत आहे", असे म्हणत भूपेंद्र यादव यांनी या बछड्यांचा व्हिडिओ शेअर केला.

नामिबियातून आणलेल्या मादा चित्ता आशाने या पिल्लांना जन्म दिला आहे. प्रकल्पात सहभागी सर्व तज्ज्ञ, कुनो वन्यजीव अधिकारी आणि संपूर्ण भारतातील वन्यजीव प्रेमींचे मी खूप अभिनंदन करतो, असे पर्यावरण मंत्री म्हणाले. तर, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत अभिनंदन केले आहे.

दरम्यान, कुनो नॅशनल पार्कममध्ये मार्च 2023 मध्ये सियाया या मादा चित्ताने चार बछड्यांना जन्म दिला होता. यांपैकी केवळ एकच बछडा जिवंत राहू शकला. भारतातून नामशेष झालेल्या चित्त्यांचे अस्तित्व पुन्हा निर्माण करण्यासाठी मध्यप्रदेशातील 'कुनो नॅशनल पार्क'मध्ये हा 'चित्ता प्रकल्प' राबवण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in