कुनो राष्ट्रीय उद्यानात ‘गामिनी’ने दिला तीन बछड्यांना जन्म

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात ‘गामिनी’ मादी चित्त्याने तीन बछड्यांना जन्म दिल्याने देशातील चित्त्यांची एकूण संख्या आता ३८ वर पोहोचली आहे, असे केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी बुधवारी सांगितले.
कुनो राष्ट्रीय उद्यानात ‘गामिनी’ने दिला तीन बछड्यांना जन्म
(Photo-X)
Published on

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात ‘गामिनी’ मादी चित्त्याने तीन बछड्यांना जन्म दिल्याने देशातील चित्त्यांची एकूण संख्या आता ३८ वर पोहोचली आहे, असे केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी बुधवारी सांगितले.

‘गामिनी’ला दक्षिण आफ्रिकेतून आणण्यात आले होते. ‘गामिनी’ दुसऱ्यांदा आई झाली असून कुनोसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.

जगात जमिनीवरील सर्वात वेगवान प्राणी असलेल्या चित्त्यांची संख्या वाढविण्याच्या एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा एक भाग म्हणून ‘गामिनी’ला दक्षिण आफ्रिकेतून आणण्यात आले होते.

logo
marathi.freepressjournal.in