धर्मेश ठक्कर/मुंबई : पेटीएम कंपनीच्या घोटाळ्यानंतर आता ‘पॉलिसीबाजार’ व ‘पैसाबाजार’च्या पी. बी. फिनटेक कंपनीने नियमनात व केवायसीचा घोळ घातल्याचे उघड झाले. याची प्राप्तिकर खात्याकडून चौकशी सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात आरबीआयने पेटीएम पेमेंट बँकेला नवीन ठेवी स्वीकारण्यास बंदी घातली आहे. तसेच बँकिंग सेवा देण्यास २९ फेब्रुवारीपासून बंदी घातली. पी. बी. फिनटेक कंपनीने दाखल केलेली प्राप्तिकर विवरणपत्रांची छाननी केल्यानंतर कंपनीने नियामक त्रुटी केल्याचे प्राप्तिकर खात्याला आढळले. पी. बी. फिनटेकने शेअर बाजाराला कळवले की, १४ डिसेंबर २०२३ रोजी आम्ही कळवले होते की, आमच्या कंपनीची प्राप्तिकर विभागाने छाननी केली. आमची उपकंपनी ‘पैसाबाजार’ ही मार्केटिंग व कन्सल्टिंग प्रा. लिमिटेडची चौकशी झाली. कंपनी प्राप्तिकर खात्याला हवी असलेली माहिती व तपशील देत आहे.