इस्रोचा 'सूर्यनमस्कार'! 'आदित्य L1'ची सूर्याच्या दिशेने झेप

काही दिवस 'आदित्य L1' उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत राहणार आहे
इस्रोचा  'सूर्यनमस्कार'!  'आदित्य L1'ची सूर्याच्या दिशेने झेप

भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर आता अवघ्या काही दिवसांमध्येच इस्रोने आणखी एक मोठी कामगिरी पार पाडली आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी 'आदित्य L 1' उपग्रहाचे आज यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. आज(2 सप्टेंबर) सकाळी 11:50 मिनिटांनी पीएसएलव्ही रॉकेटच्या मदतीने हा उपग्रह यशस्वीरित्या अवकाशात पाठवण्यात आला

यानंतर काही दिवस 'आदित्य L1' उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत राहणार आहे. त्यानंतर तो पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून, अंतराळात असणाऱ्या एल-1 पॉइंटच्या दिशेने प्रवास सुरू करेल. याठिकाणी त्याला पोहोचण्यासाठी सुमारे चार महिन्यांचा कालावधी लागेल. त्यानंतर आदित्य उपग्रहाला एल-1 पॉइंटभोवती असणाऱ्या हेलो ऑर्बिटमध्ये प्रस्थापित करण्यात येणार आहे. इस्रोचं संकेतस्थळ, फेसबुक पेज, यूट्यूब चॅनेल तसंच दूरदर्शन टेलिव्हिजन चॅनेलवरून या मोहिमेचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल.

logo
marathi.freepressjournal.in