कर्मचाऱ्यांअभावी सीबीआय तपासावर गंभीर परिणाम; सीबीआयकडून हायकोर्टात कबुली

कर्मचाऱ्यांअभावी सीबीआय तपासावर गंभीर परिणाम; सीबीआयकडून हायकोर्टात कबुली

आमच्याकडे कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. त्यामुळे आमच्या तपासकार्यावर परिणाम होत आहे, अशी कबुली सीबीआयने पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयात दिली.
Published on

चंदिगड : आमच्याकडे कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. त्यामुळे आमच्या तपासकार्यावर परिणाम होत आहे, अशी कबुली सीबीआयने पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयात दिली. यानंतर न्यायालयाने हरयाणा सरकारला आपल्या अधिकाऱ्यांना सीबीआयमध्ये प्रतिनियुक्तीवर पाठवावे, असे आदेश दिले.

न्या. विनोद एस भारद्वाज यांनी हरयाणा सरकारला सीबीआयच्या तपासासाठी पोलीस उपअधीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाचे दोन अधिकारी देण्यास सांगितले. तसेच याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल न्यायालयात पुढील सुनावणीच्या वेळी देण्यास सांगितले.

सीबीआयला हरयाणातील महसुलासंबंधीच्या एका प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश देऊन चार महिन्यात अहवाल सादर करायला सांगण्यात आले. पण, सीबीआयने आपल्याकडे कर्मचारी कमी असल्याचे सांगितले. राज्य सरकारचे अधिकारी आमच्याकडे प्रतिनियुक्तीवर पाठवावे, अशी मागणी सीबीआयने केली. त्यानंतर हायकोर्टाने राज्य सरकारला तीन अधिकारी सीबीआयला देण्यास सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in