लाडकी बहीण योजना लवकरच देशभर

आगामी लोकसभा निवडणुकीत महिलांची मते खेचण्यासाठी मोदी सरकार लाडली बहना, लाडकी बहीण ही योजना संपूर्ण देशभरात लागू करु शकते.
लाडकी बहीण योजना लवकरच देशभर

नवी दिल्ली : येत्या १ फेब्रुवारी २०२४ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीचे हे अंतरिम अर्थसंकल्प आहे. त्यामुळे लोकसभेत जोरदार कमबॅकसाठी मोदी सरकार मैदानात उतरणार आहे. तज्ज्ञांच्या मते अंतरिम अर्थसंकल्पात केंद्र सरकार अनेक मोठ्या घोषणा करू शकते. मोदी कार्यकाळाच्या २.० या बजेटमध्ये प्रत्येक वर्गाला मोठी अपेक्षा आहे. खासकरून शेतकरी, तरुण आणि महिलांसाठी हा अर्थसंकल्प खास असेल.

आगामी लोकसभा निवडणुकीत महिलांची मते खेचण्यासाठी मोदी सरकार लाडली बहना, लाडकी बहीण ही योजना संपूर्ण देशभरात लागू करु शकते. प्राप्त माहितीनुसार, त्यासाठी पात्रता, निकष, वार्षिक उत्पन्न, त्याचा फायदा याची चर्चा सुरु झालेली आहे. ही योजना देशातील महिलांसाठी खास असेल. मध्य प्रदेशातील निवडणुकीत या योजनेने मोठी भूमिका अदा केली आहे. लाडली बहना योजने भाजपला मोठी लीड घेऊन दिली. राजकीय तज्ज्ञांच्या मते, यावेळी महिलांसाठी या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या निधीची तरतूद करण्यात येऊ शकते. अंतरिम बजेटमध्ये सरकार महिलांना थेट खात्यात रक्कम जमा करणे, कौशल्य विकास योजनांचा लाभ मिळू शकतो. महिला शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून वार्षिक ६००० रुपयांऐवजी १२००० रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते. मनरेगात महिलांना विशेष आरक्षण देऊन, त्यांचे मानधन वाढविण्यात येऊ शकते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in