लालूप्रसादांनी घेतली नितीशकुमारांची भेट; सर्वकाही ठिक - तेजस्वी यादव यांची प्रतिक्रिया

आरजेडी आणि जेडीयू यांची युती घट्ट असून भाजपला हरवण्यासाठी लोकसभा निवडणूक एकत्रित लढविणार आहेत.
लालूप्रसादांनी घेतली नितीशकुमारांची भेट; सर्वकाही ठिक - तेजस्वी यादव यांची प्रतिक्रिया

पाटणा : राष्ट्रीय जनता दल आरजेडीचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी शुक्रवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली. तेव्हा लालूप्रसाद यांच्यासोबत बिहारचे उपमुख्यमंत्री व त्यांचे पुत्र तेजस्वी यादव होते. या भेटीनंतर तेजस्वी यादव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दोन्ही नेत्यांमध्ये कोणतेही मतभेद अथवा दरी नाही हेच सत्य आहे, हे या भेटीतून सिद्ध झाल्याचे सांगितले. अलीकडे दोन्ही नेत्यांच्या जाहीर वक्तव्यांवरून त्यांच्यात मतभेद झाल्याची अफवा पसरली होती. ती तेजस्वी यादव यांनी खोडून काढली आहे.

यावेळी तेजस्वी पत्रकारांना उद्देशून म्हणाले की, आपण लोक जेव्हा असे निरर्थक प्रश्न विचारता तेव्हा वार्इट वाटते. महागठबंधनात जागावाटप निश्चित होणार असतानाही तुम्हा लोकांना इतकी पराकोटीची उत्सुकता का आहे, असा प्रश्न देखील तेजस्वी यांनी यावेळी पत्रकारांना विचारला. अजून भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने जागावाटप निश्चित केले आहे का? पण तुम्हा लोकांना त्याबाबत चिंता नाही, असा उलट प्रश्न देखील तेजस्वी यांनी पत्रकारांना केला. महागठबंधन आघाडीत जनता दल युनायटेडचे नेते नवे आहेत. ते जागावाटपाबाबत आग्रही आहेत. त्यांची सूचना आरजेडीने दोन दिवसांपूर्वीत धुडकावून लावली होती. जनता दल युनायटेड पक्षाला २०१९ लोकसभा निवडणुकीत २६ जागा पाहिजेत, असा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे आरजेडी पक्षाला देखील बिहारमधील अधिकाधिक लोकसभा जागा हव्या आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये दरी वाढेल, असा तर्क लढवला जात आहे. आरजेडी पक्षाचे बिहार विधानसभेत वर्चस्व आहे. यामुळे हा पक्ष अधिक जागांसाठी आग्रही राहणार आहे. जनता दलासाठी दारे बंद नाहीत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. त्याबाबत पत्रकारांनी छेडले असता आपणास याबाबत काहीच कल्पना नसल्याचे म्हटले आहे. अमित शहांना काय करायचे आहे याबाबत आपणा लोकांना माहीत असणारच, असा टोला देखील तेजस्वी यांनी यावेळी लगावला. तेजस्वी ईडीच्या रडारवर आहेत. ईडीने पाठवलेले दोन समन्स त्यांनी दुर्लक्षित केले आहेत. आम्ही सरकार चालवत आहोत आणि आम्ही जनतेसाठी काम करण्याच्या कार्यक्रमापासून दूर जाणार नाही. आरजेडी आणि जेडीयू यांची युती घट्ट असून भाजपला हरवण्यासाठी लोकसभा निवडणूक एकत्रित लढविणार आहेत. नितीश कुमार हे जुने भाजपचे मित्र, त्यांनी २०२३ ऑगस्ट महिन्यात युती तोडली होती. कारण भाजप त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र एनडीएला हरवण्याचा मार्ग पत्करल्यामुळे त्यांनी आरजेडीसोबत २०२४ साली पुन्हा युती केली.

logo
marathi.freepressjournal.in