
नवी दिल्ली : जमिनीच्या बदल्यात नोकरीप्रकरणी ‘ईडी’ने माजी रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांची ६ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. सध्या लालूप्रसाद व त्यांच्या कुटुंबीयांची ‘जमिनीच्या बदल्यात नोकरी’ घोटाळाप्रकरणी चौकशी सुरू आहे. लालूंच्या कुटुंबातील अनेक जणांची चौकशी सीबीआयने केली आहे.
सीबीआयने या प्रकरणाची दोन वेळा चौकशी केली आहे. त्यात त्यांना कोणतेही तथ्य सापडले नाही. त्यानंतर सीबीआयने हा खटला बंद केला होता. आता पुन्हा सीबीआयला या प्रकरणाची सुनावणी करायची आहे.