मणिपूरमध्ये झालेल्या भूस्खलनात टेरिटोरियल आर्मी कॅम्पचे नुकसान,३० ते ४० जवान दबले

या घटनेनंतर मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे
मणिपूरमध्ये झालेल्या भूस्खलनात टेरिटोरियल आर्मी कॅम्पचे नुकसान,३० ते ४० जवान दबले

मणिपूरमध्ये बुधवारी रात्री नोनी जिल्ह्यातील तुपूल रेल्वे स्थानकालगत झालेल्या भूस्खलनात १०७ टेरिटोरियल आर्मी कॅम्पचे जबर नुकसान झाले. या दुर्घटनेत कॅम्पमधील ३० ते ४० जवान दबले गेले आहेत. यात ७ जवानांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. तर १३ जवानांना वाचवण्यात यश मिळाले आहे.

अद्याप ३० ते ४० जवान मातीखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. जखमींना मदत करण्यासाठी डॉक्टरांचे एक पथकही घटनास्थळाकडे रवाना झाले आहे.

जखमींवर नोनी आर्मी मेडिकल युनिटमध्ये उपचार सुरू आहेत. भूस्खलनाचा इजाई नदीच्या प्रवाहालाही फटका बसला आहे. ही नदी तामेंगलोंग व नोनी जिल्ह्यातून वाहते.

एका अधिकाऱ्याच्या मते, खराब हवामानामुळे मदत कार्य राबवण्यात अडचण येत आहे. लष्कराचे हेलिकॉप्टरही घटनास्थळी पोहोचली आहेत. जिल्हा प्रशासनाने आसपासच्या ग्रामस्थांना खबरदारीचा व लवकरात लवकर जागा खाली करण्याचा इशारा दिला आहे. भूस्खलनाच्या ढिगाऱ्यामुळे इजाई नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in