जम्मू-काश्मीरमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त

कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांची कारवाई
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे घातपाताचा डाव उधळून लावण्यात यश आले आहे.

लष्कर, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि स्थानिक पोलिसांनी १५ ते १८ ऑगस्ट दरम्यान कुपवाडा जिल्ह्यातील माछल सेक्टरमध्ये ही शोध मोहीम पार पाडली. या भागात दहशतवाद्यांनी शस्त्रे लपवल्याची गुप्त माहिती सेनादलांना मिळाली होती. त्याच्या आधारावर ही संयुक्त कारवाई करण्यात आली, असे लष्कराच्या चिनार कोअरच्या वतीने सांगण्यात आले. या कारवाईत सेनादलांनी ५ एके-४७ रायफल्स, ७ पिस्तुले, ४ हातबॉम्ब, अनेक काडतुसे आणि युद्धजन्य साहित्य जप्त केले. त्यामुळे मोठा घातपात टाळण्यात सेनादलांना यश आले आहे. या भागात आणखी शोध मोहीम सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in