‘लष्कर-ए-तोयबा’च्या दहशतवाद्याला केली अटक

स्फोटाशी काही धागेदोरे मिळतात, याबाबत सतत चौकशी करण्यात आली.
‘लष्कर-ए-तोयबा’च्या दहशतवाद्याला केली अटक
Published on

जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात २८ व २९ सप्टेंबरला झालेल्या दोन बसमधील बॉम्बस्फोटप्रकरणी पोलिसांनी ‘लष्कर-ए-तोयबा’च्या पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक केली आहे. मोहम्मद अस्लम शेख, असे या दहशतवाद्याचे नाव आहे.

पाकिस्तानी हँडलर मोहम्मद अमीन भट उर्फ खुबैब याच्या आदेशावरून आपण २८ सप्टेंबरला रामनगर बस स्टँड येथे आयईडी टाकला होता. अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी सांगितले की, तपास करताना काही ठिकाणाहून संशयितांना अटक केली. स्फोटाशी काही धागेदोरे मिळतात, याबाबत सतत चौकशी करण्यात आली. मोहम्मद अमीन भट या स्फोटात सामील असल्याचे आढळले. तो पाकिस्तानात राहतो. अस्लम शेख या नावाच्या दहशतवाद्याशी त्याने सोशल मीडिया ॲॅपच्या सहाय्याने संपर्क केला. ड्रोनच्या सहाय्याने तीन बॉम्ब व चार आयईडी दिले. पकडलेला गेला मोहम्मद अस्लम हा पाकिस्तानातील एका हँडलरच्या संपर्कात होता. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे ४ व ५ ऑक्टोबरला जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते ३० सप्टेंबर रोजी जम्मू-काश्मीरला जाणार होते; मात्र राज्यातील दहशतवादी हल्ले पाहता त्यांच्या दौऱ्याच्या तारखेत बदल करण्यात आले. ४ ऑक्टोबरला शहा हे राजौरीला तर ५ ऑक्टोबरला ते बारामुल्ला येथे जाणार आहेत. शहा यांच्या दौऱ्यापूर्वी ५ ते ६ दहशतवादी ठार झाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in