राष्ट्रपतींच्या हस्ते आयएनएस विंध्यगिरीचे जलावतरण

नीलगिरी श्रेणीतील ही विनाशिका क्षेपणास्त्राने सुसज्ज आहे
राष्ट्रपतींच्या हस्ते आयएनएस विंध्यगिरीचे जलावतरण

कोलकाता : भारतीय सैन्य दलाच्या सर्वोच्च कमांडर व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी येथे आयएनएस विंध्यगिरी या युद्धनौकेचे जलावरण केले. नीलगिरी श्रेणीतील ही विनाशिका क्षेपणास्त्राने सुसज्ज आहे.

‘प्रोजेक्ट १७ ए’ अंतर्गत भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन विभागाने याचे रेखाकन केले आहे. या युद्धनौकेवर ब्रह्मोस क्षेपणास्त्र व दोन हेलिकॉप्टर तैनात केले आहेत

विंध्यगिरीची वैशिष्ट्ये

ही विनाशिका पाणबुडीविरोधी रॉकेट लाँचर्सने सुसज्ज असून, त्याच्यावर ऑटोमेलारा गनही आहे. या गनद्वारे शत्रूच्या जहाज किंवा हेलिकॉप्टरवर हल्ला करून तिला उद‌्ध्वस्त करू शकते. तिच्यावरून ‘बराक-८’ क्षेपणास्त्र डागता येऊ शकते. स्टेल्थ फिचर्स, अत्याधुनिक हत्यारे, सेन्सर, प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टीम, रडार यंत्रणा आदी यंत्रणा या युद्धनौकेवर आहेत. ही युद्धनौका ४८८.१० फूट लांब आहे, तर तिचे बीम ५८.७ फूट आहे. तिच्या २ जनरल इलेक्ट्रिकचे इंजिन लावले आहेत. ही युद्धनौका इलेक्ट्रिक-डिझेलवर चालणारी आहे. तिचा सर्वात जास्त वेग ५२ किमी प्रति तास आहे. तिच्यात ३५ अधिकारी व २२६ नौसैनिक राहू शकतात. ५२ किमी प्रति तास वेगाने निघाल्यास तिचा पल्ला ४६०० किमी असेल, तर ३० ते ३३ किमी प्रति तासाने निघाल्यास ती १०,२०० किमी जाऊ शकते. अडचणीच्या काळात हल्ला करायला तिच्यावर दोन बोटी ठेवल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in