लॉरेन्स बिश्नोई गँगने केली 'सुक्खाची हत्या ; फेसबुकवर पोस्ट करत स्वीकारली जबाबदारी

कितीही दूर गेलात तरी पापाची शिक्षा नक्की मिळेल, असं देखील लॉरेन्स बिश्नोई गँगने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
लॉरेन्स बिश्नोई गँगने केली 'सुक्खाची हत्या ; फेसबुकवर पोस्ट करत स्वीकारली जबाबदारी

कॅनडात हत्या झालेला गँगस्टर सुक्खाच्या हत्येबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगने कँनेडातील पिनीपेग सिटीत झालेल्या सुखदूल सिंह उर्फ सुक्खाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. लॉसेन्स बिश्नोईन फेसबुक प्रोफाईलवरुन पोस्ट करत या हेत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. यासोबतचं या पोस्टमध्ये इतर गँगस्टर्सना धमकी देखील दिली आहे. तसंच कितीही दूर गेलात तरी पापाची शिक्षा नक्की मिळेल, असं देखील लॉरेन्स बिश्नोई गँगने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काय आहे नेमकी फेसबुक पोस्ट ?

लॉरेन्स बिश्नोई नावाच्या फेसबुक प्रोफाईलवरुन करण्यात आलेल्या या पोस्टमध्ये सत श्री एकाल, सर्वांना रामराम...हा सुक्खा दुनिके जो बंबिहा ग्रुपचा इचार्ज असल्याचं सांगत फिरत होता. त्याची कॅनेडातील विनपेग शहरात हत्या झाली आहे. याची जबाबदारी बिश्नोई ग्रुप घेत आहे. अमली पदार्थांचं व्यसन लागलेला आणि आपलं व्यसन पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी त्याने अनेक घरे उद्धवस्त केलीत.

यानेच आमचा भाऊ गुरलाल बरार, विक्की मिद्दुखेडा यांच्या हत्येच्या वेळी बाहेर बसून सर्वकाही केलं. संदीप नांगल अंबिया मर्ड देखील याने करायला लावला. त्याला त्याच्या पापांची शिक्षा मिळाली. फक्त एक गोष्ट सांगायची आहे. जे दोघे०तिघे अजूनही राहिले आहेत. शक्य तिथे पळून जा, जगातल्या कुठल्याही देशात जा. पण आमच्याशी शत्रुत्व करुन वाचाल अस समजु नका. कमी-जास्त वेळ लागेल, पण प्रत्येकाला त्यांनी केलेल्या कृत्यांची शिक्षा मिळेल.

नेमकं काय आहे प्रकरण?

पंजाबमधील रहिवासी असलेला आणि भारतातून फरार होऊन कॅनडात आश्रय घेतलेला गँगस्टर सुखदूल सिंग उर्फ सुक्खा दुनुके याची गुरुवारी कॅनडात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सुक्खा हा खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप सिंग उर्प अर्श डाला याचा उजवा हात मानला जात होता. तसंच एनआयएच्या वाँटेड यादीत देखील सुक्खाचा समावेश होता. नुकतेच ९ कुख्यात गँगस्टर आणि खलिस्तानी दहशतवाद्यांची नावं समोर आली होती. यात सुक्खाचं देखील नाव होतं.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in