लॉरेन्स बिश्नोई हा सिद्धू मुसेवाला हत्याकांडाचा मास्टरमाईंड, दिल्ली पोलिसांचा मोठा खुलासा

पुण्यात एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याचे नाव महाकाल असल्याचे सांगण्यात येत आहे
लॉरेन्स बिश्नोई हा सिद्धू मुसेवाला हत्याकांडाचा मास्टरमाईंड, दिल्ली पोलिसांचा मोठा खुलासा
Special Commissioner of Police (Special Cell) H S Dhaliwal ANI

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Gangster Lawrence Bishnoi) हा सिद्धू मुसेवाला खून प्रकरणाचा मास्टरमाईंड आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे स्पेशल सीपी एचजीएस धालीवाल (H S Dhaliwal) यांनी ही माहिती दिली. मुसेवालाच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अटक करण्यात आलेला महाकाल हा एक दुवा ठरणार आहे. गँगस्टर लॉरेन्स विश्नोई याने सिद्धू मुसेवालाला मारण्याची शपथ फार पूर्वी घेतली होती, शिवाय या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार देखील तोच आहे. स्पेशल सेलचे सीपी धालीवाल यांनी मीडियासमोर ही कबुली दिली. 

सिद्धू मुसेवालाची पंजाबमध्ये २९ मे रोजी हत्या करण्यात आली होती. पुण्यात एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याचे नाव महाकाल असल्याचे सांगण्यात येत आहे, त्याला मकोका अंतर्गत अटक करण्यात आली आहे. लॉरेन्सच्या सांगण्यावरून त्याने अनेक घटना घडवून आणल्या असून दिल्ली पोलिस स्पेशल सेलही संयुक्त तपास करत आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in