Video : दिल्ली हायकोर्टाच्या कँटिनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, खुर्चीवर बसण्यावरून वकील भिडले

एका महिला वकिलाने दुसऱ्या वरिष्ठ महिला वकिलाच्या थेट कानशिलात लगावल्याचा प्रत्यक्षदर्शींचा दावा
Video : दिल्ली हायकोर्टाच्या कँटिनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा,
खुर्चीवर बसण्यावरून वकील भिडले

दिल्ली उच्च न्यायालयातील वकिलांच्या कँटिनमध्ये मंगळवारी चक्क खुर्चीवरून जोरदार राडा झाला. वाद वाढल्यावर एका महिला वकिलाने दुसऱ्या वरिष्ठ महिला वकिलाच्या थेट कानशिलात लगावल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

माहितीनुसार, वकिलांच्या एका गटाचा एका महिला वकिलाशी कँटिनमधील टेबलवर जेवणास बसण्यावरून वाद झाला. महिला वकिल ज्या टेबलवर बसली होती तो टेबल तिला वकिलांच्या गटाने सोडण्यास सांगितला. त्यामुळे ती भडकली आणि गोंधळाला सुरूवात झाली. हाय व्होल्टेज ड्रामाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in