पहिल्याच पावसात अयोध्येतील राम मंदिरात गळती? मुख्य पुजाऱ्यांचा दावा; चौकशीची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यंदा थाटामाटात उद‌्घाटन झालेल्या अयोध्येतील राम मंदिरात पहिल्या पावसाने गळती सुरू झाल्याचा दावा रामललांचे प्रमुख पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी केला आहे.
पहिल्याच पावसात अयोध्येतील राम मंदिरात गळती? मुख्य पुजाऱ्यांचा दावा; चौकशीची मागणी

अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यंदा थाटामाटात उद‌्घाटन झालेल्या अयोध्येतील राम मंदिरात पहिल्या पावसाने गळती सुरू झाल्याचा दावा रामललांचे प्रमुख पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

रामललांचे मुख्य पुजारी असलेल्या आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले की, २२ जानेवारी रोजी झालेल्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर राम मंदिर सर्वसामान्यांना दर्शनासाठी उघडले होते. मात्र, मान्सूनपूर्व पहिल्याच पावसात रामललांच्या मंदिरातील छताला गळती लागली आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याची होत असलेली गळती धक्कादायक आहे. राम मंदिराच्या बांधकामामध्ये काही हलगर्जी व त्रुटी झाल्याचे दिसत आहे. रात्री पाऊस पडल्यानंतर सकाळी पुजारी जेव्हा पूजेसाठी मंदिरात गेले, तेव्हा तिथे पाणी भरलेले दिसून आले. खूप प्रयत्न करून हे पाणी मंदिर परिसरातून बाहेर काढण्यात यश आले, अशी माहितीही त्यांनी दिली.

प्रमुख पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी केलेल्या दाव्यानुसार, अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहाच्या छतामधून काही दिवसांपूर्वी पाण्याची गळती होत होती. त्यानंतर दुरुस्तीचे काम करून ही गळती बंद केली गेली. त्यानंतर मान्सूनपूर्व पहिल्या पावसात मंदिरात पुजाऱ्यांचे बसण्याचे ठिकाण आणि व्हीआयपी दर्शनासाठी जिथे लोक येतात, त्याठिकाणी पावसाचे पाणी गळत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने हे पाणी बाहेर काढण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे.

logo
marathi.freepressjournal.in