दिल्लीत बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत
PM

दिल्लीत बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत

आठवडाभरापूर्वी दक्षिण दिल्लीतील सैनिक फार्म परिसरात बिबट्या दिसला होता आणि वनविभागाने या प्राण्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले होते

नवी दिल्ली : दिल्लीच्या उत्तर भागातील अलीपूरमधील खातुश्याम मंदिराजवळ राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वर बिबट्याचे एक पिल्लू मृतावस्थेत आढळून आले. या संबंधात पोलिसांना बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास फोन आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना बिबट्याचा मृतदेह सापडला. एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे रस्ता अपघाताचे प्रकरण असून पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी वनविभागाला कळविण्यात आले आहे. आठवडाभरापूर्वी दक्षिण दिल्लीतील सैनिक फार्म परिसरात बिबट्या दिसला होता आणि वनविभागाने या प्राण्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले होते. पिंजरा रिकामा होताच, वन अधिकाऱ्यांनी सांगितले की, बिबट्या अरवलीच्या जंगलात परत गेला आहे. तर आणखी एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण दिल्लीत दिसलेला तो हाच आहे की नाही हे वन अधिकारी तपासतील.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in