थंडीचा जोर कमी! देशातील 'या' राज्यात 'अवकाळी' पावसाची शक्यता, हवामान खात्याची माहिती

पर्वतीय भागात जोरदार बर्फवृष्टी पाहायला मिळणार असल्याचं देखील हवामान खात्यानं सांगितलं.
थंडीचा जोर कमी! देशातील 'या' राज्यात 'अवकाळी' पावसाची शक्यता, हवामान खात्याची माहिती

देशात थंडी कमी झाली असून अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने नासधुस केली आहे. गेल्या २४ तासात अनेक ठिकाणी वादळी, वारा, गारपीटसह मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार देशात पुढील काही तास पाऊस असणार आहे. सोबत पर्वतीय भागात जोरदार बर्फवृष्टी पाहायला मिळणार असल्याचं देखील हवामान खात्यानं सांगितलं. यामुळे उत्तर भारतात थंडीची लाट देखील येणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

काल रात्री महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी वादळी वारा तर काही ठिकाणी गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकासानं झालं. आता हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्र राज्यासह गोवा, कर्नाटक, गुजरात आणि केरळ राज्यांत येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. या राज्यातील काही ठिकाणी जोरदार ते रिमझिम स्वरुपाचा पाऊस असणार आहे. राज्यात कोकणासह, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, वाशिम येथे पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे.

तर मुंबई आणि दिल्लीत शहरात देखील पावसाचा अंदाज आहे. उत्तराखंड राज्यात २८ नोव्हेंबर रोजी पावसाची शक्यता वर्तवली आहे. छत्तीसगड राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काल रात्री(२६ नोव्हेंबर) मराठवाड्यासह महाराष्ट्रात वादळी पाऊस झाला. तर आज देखील राज्यातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळणार असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यावेळी विजांचा कडकडात देखील होईल, असा अंजाद वर्तवण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in