जीवन विमा कंपन्यांचा नवीन प्रीमियममध्ये वाढ

एलआयसीचा बाजारातील हिस्सा ६८.६ टक्के आहे, असे इन्शुरन्स रेग्युलेटरी इन्शुरन्स रेग्युलेटरी अॅण्ड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया (इर्डा)ने सांगितले
जीवन विमा कंपन्यांचा नवीन प्रीमियममध्ये वाढ

जीवन विमा कंपन्यांचा नवीन व्यवसाय प्रीमियम जुलैमध्ये ९१ टक्क्यांनी वाढून ३९,०७८ कोटी रुपये झाला आहे. २४ जीवन विमा कंपन्यांचा नवीन प्रीमियम जुलै २०२१ मध्ये २०,४३४ कोटी रुपये होता. तर देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी एलआयसीचा प्रीमियम दुप्पट झाला आहे. त्याचे प्रीमियम उत्पन्न एका वर्षापूर्वी १२,०३० कोटी रुपयांच्या तुलनेत २९,११६ कोटी रुपये झाले आहे. एलआयसीचा बाजारातील हिस्सा ६८.६ टक्के आहे, असे इन्शुरन्स रेग्युलेटरी इन्शुरन्स रेग्युलेटरी अॅण्ड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया (इर्डा)ने सांगितले.

२३ खासगी कंपन्यांच्या प्रीमियममध्ये १९ टक्के वाढ

इर्डाच्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये २३ खासगी क्षेत्रातील कंपन्यांचा प्रीमियम ९,९६२ कोटी रुपये होता. एका वर्षापूर्वी तो ८,४०३ कोटी रुपये होता. एप्रिल-जुलै दरम्यान सर्व कंपन्यांचे प्रीमियम ५४ टक्क्यांनी वाढून रु. १,१२,७५३.४३ कोटींवर पोहोचले आहेत, जे एका वर्षापूर्वी रु. ७३,१५९.९८ कोटी होते. या कालावधीत एलआयसीचा प्रीमियम ६२ टक्क्यांनी वाढून ७७,३१७ कोटी रुपये झाला आहे. तर खासगी कंपन्यांचा प्रीमियम ३९ टक्क्यांनी वाढून ३५,४३५.७५ कोटी रुपये झाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in