भगवान हनुमानाप्रमाणे उद्योगाला क्षमता, ताकदीचा विसर पडला - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

सीतारामन यांनी मंगळवारी आयोजित हिरो माइंडमाइन संमेलनात मार्गदर्शन करत होत्या.
भगवान हनुमानाप्रमाणे उद्योगाला क्षमता, ताकदीचा विसर पडला - अर्थमंत्री निर्मला सीतारामन
Published on

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय कंपन्यांची तुलना भगवान हनुमानाशी केली आहे. तसेच ज्याप्रमाणे हनुमंताला त्यांच्या शक्तीचा विसर पडला होता. त्याचप्रमाणे भारतीय कंपन्यांना त्यांच्या क्षमता आणि सामर्थ्याचा विसर पडला आहे का? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी भारतीय कंपन्यांना उत्पादन क्षेत्रात देखील गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे अर्थमंत्री सीतारामन यांनी भारतीय उद्योजकांना नव्या क्षेत्रात जाण्याचे आवाहनही केले.

सीतारामन यांनी मंगळवारी आयोजित हिरो माइंडमाइन संमेलनात मार्गदर्शन करत होत्या. सीतारामन यांनी भारतीय कंपन्यांना विचारले की, जेव्हा इतर देश भारतावर विश्वास दाखवत आहेत. तेव्हा भारतीय कंपन्या, उद्योजक हे उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक करण्यास का मागे पडत आहेत. त्यांना यात न येण्यास काय अडचण आहे. अन्य विदेशातील व्यावसायिक मोठ्या प्रमाणात भारतात सहभागी होण्यास इच्छुक आहे. तर दुसरीकडे भारतीय उद्योजक दुर्लक्ष करीत आहेत.

अर्थमंत्री पुढे म्हणाले, 'एफडीआय आणि एफपीआय भारतात येत आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांचा भारतावर विश्वास आहे, मग भारतीय उद्योगांना कोण रोखत आहे? त्या म्हणाल्या की, भारतीय कंपन्या भगवान हनुमानजीप्रमाणे आहेत, की त्यांचा त्यांच्या क्षमतेवर आणि ताकदीवर विश्वास नाही.

भारतीय उद्योगांसाठी हा सुवर्णकाळ

निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या की, भारतासाठी हा सुवर्णकाळ आहे, सरकार उद्योगाचे ऐकण्यासाठी आणि तुम्ही आम्हाला जे द्याल त्यावर काम करण्यास तयार आहे. यावेळी आम्ही संधी सोडू शकत नाही आणि गती गमावूही शकत नाही.

अर्थमंत्र्यांनी सांगितले की, एनडीए सरकार उद्योगांना भारतात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करेल. आणि आवश्यक ​​​​​​ कार्यक्रमही देईल. ते म्हणाले की, भारताच्या खासगी क्षेत्राला चालना देण्यासाठी कर सूट आणि उत्पादन-लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) यासारखी इतर धोरणे आधीच लागू करण्यात आली आहेत. त्या म्हणाल्या की, पीएलआय सारख्या उपाययोजनांमुळे, आणखी बरेच व्यवसाय त्यांचे उत्पादन कार्य चीनमधून भारतात हलवण्याच्या विचारात आहे.

स्थानिक पातळीवर प्रशिक्षण

आणि रोजगारासाठी प्रयत्न

निर्मला सीतारामन म्हणाल्या की, येत्या २५ वर्षात भारताने कर्मचाऱ्यांचा फायदा कसा होईल, यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पीएलआय योजनांच्या बाबतीत, आम्ही आमच्या श्रमशक्तीवर त्याचा परिणाम पाहिला आहे.

एमएसएमईसाठी आम्ही स्थानिक पातळीवर प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उपाय शोधत आहोत. त्यामुळे धोरणांमध्ये श्रमाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आलेले आहे. काही इलेक्ट्रॉनिक घटक, फार्मा आणि वैद्यकीय उपकरणे यासारख्या अधिक क्षेत्रांमध्ये उत्पादन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजना विस्तारित करण्याची मागणी आहे. या प्रस्तावांवर सरकार चर्चा करत आहे.

logo
marathi.freepressjournal.in