नवी दिल्ली: गुंतवणूक व्यवस्थापन क्षेत्रातील नामांकित लिंगोटो कंपनीने टीव्हीएस इंडस्ट्रीयल आणि लॉजिस्टिक्स पार्कस कंपनीचे १६.५ टक्के समभाग ब्रिटिश इंटरनॅशनल इनव्हेस्टर कंपनीकडून खरेदी केले आहेत. यामुळे लिंगोटोकडील या कंपनीची एकूण भागीदारी २१ टक्के झाली आहे. टीव्हीएस इंडस्ट्रीयल अॅड लॉजिस्टिक्स पार्क्सचे उपाध्यक्ष रवी स्वामिनाथन यांनी वखार आणि मालवाहतूक क्षेत्रात आम्हाला तंत्रज्ञानआधारीत पायाभूत सुविधा उभारायच्या आहेत असे विधान केले आहे. सततच्या मागणीमुळे आम्ही मागील दोन दशकांपासून मजबूत विकास साध्य केला आहे. तसेच टिकाउ आणि नाविन्यपूर्ण उत्पादने सातत्याने सादर केली आहेत. आता कंपनी पुढच्या पातळीवर नेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे भविष्यासाठी व्यूहरचनात्मक गुंतवणुकीची गरज आहे. हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आम्ही लिंगोटोचे स्वागत करीत आहोत. ते एक मौलिक भागीदार सिद्ध होतील. संचालक मंडळ देखील या निर्णयाबाबत समाधानी आहे.