ही तर त्यांच्या कर्माची फळे, केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

मद्य वाईट आहे याची जाणीव एखाद्या लहानग्यालाही आहे. त्यामुळे यापासून दूर राहावे, असे आपण बजावले होते. मात्र...
ही तर त्यांच्या कर्माची फळे,  केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्ली सरकारच्या अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी गुरूवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. शुक्रवारी दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्यांना २८ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्यासमवेत २०१० मध्ये लोकपाल चळवळीचे नेतृत्व केले होते.

दिल्लीचे मुख्यमंत्री स्वत:च्या कर्माची फळे भोगत आहेत, मद्य धोरण आखणे हे आपले काम नाही, मद्य वाईट आहे याची जाणीव एखाद्या लहानग्यालाही आहे. त्यामुळे यापासून दूर राहावे, असे आपण बजावले होते. मात्र, केजरीवाल यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि धोरण आखले, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी केजरीवाल यांच्या अटकेबाबत व्यक्त केली. या धोरणामुळे आपल्याला अधिक पैसे मिळविता येतील असे त्यांना वाटले आणि म्हणूनच त्यांनी हे धोरण आखले. त्यांची कृती रुचली नाही म्हणून त्यांना दोनदा पत्रही लिहिले. त्यांनी अशी पावले उचलली नसती तर त्यांच्या अटकेचा प्रश्नच उद्भवला नसता, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in