भारतातल्या लोकप्रिय मुख्यमंत्र्याची यादी जाहीर ; 'हे' पाच मुख्यमंत्री आहेत सर्वात लोकप्रिय

या सर्वेत एकूण १३४, ४८७ लोकांनी आपला सहभाग नोंदवून आपला मुख्यमंत्री निवडला आहे.
भारतातल्या लोकप्रिय मुख्यमंत्र्याची यादी जाहीर ; 'हे' पाच मुख्यमंत्री आहेत सर्वात लोकप्रिय

आगामी लोकसभा निवडणुकीतील जांगांसर्भात इंडिया टुडे-सीव्होटर मूड ऑफ द नेशनचं सर्वेक्षण प्रसिद्ध झालं आहे. ज्यात देशभरातील राज्यांच्या जनतेचा कौल जाणून घेण्यात आला आहे. या सर्वेक्षणात लोकसभेतील जागांच्या मुल्यांकनासह भारताच्या ५० मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीचं मूल्यांकन करण्यास सांगितलं होतं. या सर्वेत एकूण १३४, ४८७ लोकांनी आपला सहभाग नोंदवून आपला मुख्यमंत्री निवडला आहे.

१५ जुलै ते १४ ऑगस्ट दरम्यान घेण्यात आलेल्या या सर्वेक्षणात लोकांना त्यांच्या देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री कोण असा प्रश्न विचारण्यात आला. याला प्रत्यूत्तर म्हणून सर्वात जास्त मते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाला मिळाली आहे. योगींना देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून ४३ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना या सर्वेत दुसरं स्थान मिळालं आहे. या सर्वेत १९ टक्के लोकांनी अरविंद केजरीवाल यांना पसंती दिली आहे.

जानेवारी २०२३ मध्ये झालेल्या सर्वेच्या तुलनेत यावेळी योगी आदित्यनाथ यांना मिळालेली लोकप्रियता चार टक्क्यांनी वाढली आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची लोकप्रियता तीन टक्क्यांनी कमी झाली आहे. या यादीत इतरही मुख्यमंत्र्यांची नावे आहेत.

देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पश्मिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तिसरा क्रमांक आहे. ममता बॅनर्जी यांना ८.८ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन हे चौथ्या क्रमांकावर आहेत. स्टॅलिन यांना लोकांनी ५.६ टक्के मत दिली आहेत. यानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना ३ टक्के मते मिळाली असून त्यांचा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पाचवा क्रमांक लागला आहे.

logo
marathi.freepressjournal.in