उद्योगपतींचे कर्जमाफ, तर शेतकऱ्यांचे का नाही? भंडारा येथील सभेत राहुल गांधी यांचा सवाल

बेरोजगारी, वाढती महागाई हे सध्या देशातील जनतेला भेडसावणारे मुख्य प्रश्न आहेत, मात्र माध्यमांचे त्याकडे दुर्लक्ष आहे. केंद्रात काँग्रेस सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, बेरोजगारी आणि वाढती महागाई याने जनता पिचून गेली आहे.
उद्योगपतींचे कर्जमाफ, तर शेतकऱ्यांचे का नाही? भंडारा येथील सभेत राहुल गांधी यांचा सवाल

भंडारा : देशातील उद्योगपतींचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ केले जाते, तर अन्नदाता शेतकऱ्यांचे कर्ज का माफ केले जात नाही, असा सवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी येथे केला आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर केंद्रात काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, अशी घोषणाही राहुल गांधी यांनी येथे केली. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे एका जाहीर सभेत ते बोलत होते.

बेरोजगारी, वाढती महागाई हे सध्या देशातील जनतेला भेडसावणारे मुख्य प्रश्न आहेत, मात्र माध्यमांचे त्याकडे दुर्लक्ष आहे. केंद्रात काँग्रेस सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, बेरोजगारी आणि वाढती महागाई याने जनता पिचून गेली आहे. जनता हजार रुपये कमावते तर काहीजण कोट्यवधी रुपये कमावतात. मात्र दोघांना सारखाच जीएसटी भरावा लागतो, असेही गांधी म्हणाले.

जात जनगणना देशासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे काँग्रेस सत्तेवर आल्यास जातनिहाय जनगणना केली जाईल, अग्निवीर योजनाही रद्द केली जाईल, मोदी स्वत:ला इतर मागासवर्गीय म्हणतात, मात्र त्यांनी १० वर्षांत या समाजासाठी काय केले ते सांगावे, केंद्र सरकार मोजक्या उद्योगपतींसाठी काम करीत असून सर्वसामान्य जनतेच्या पदरी निराशाच पडत आहे, असेही ते म्हणाले. देशातील ५० टक्के जनतेकडे जेवढी संपत्ती आहे तेवढीच संपत्ती केवळ २२ व्यक्तींकडे आहे. पण मोदी केवळ धर्माबद्दलच भाष्य करतात आणि जाती-समाजात वैर निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्सचे दर १० वर्षांत गगनाला भिडले. त्यामुळे आता विमानतळ, बंदरे, रस्ते, पूल, कोळशाच्या खाणी आणि ऊर्जा प्रकल्प अशा सर्वच क्षेत्रात अदानींचा शिरकाव सुरू झाला आहे, असे गांधी म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in