लोकसभा निवडणुका आज होणार जाहीर; दुपारी ३ वाजता वेळापत्रकाची घोषणा

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा आज (शनिवारी) निवडणूक आयोगामार्फत केली जाणार आहे.
लोकसभा निवडणुका आज होणार जाहीर; दुपारी ३ वाजता वेळापत्रकाची घोषणा

नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा आज (शनिवारी) निवडणूक आयोगामार्फत केली जाणार आहे. लोकसभा आणि काही राज्यांमधील विधानसभांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज दुपारी ३ वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने 'एक्स' या समाज माध्यमावरून जाहीर केले आहे.

विद्यामान लोकसभेची मुदत १६ जून रोजी संपुष्टात येणार असून त्यापूर्वी नव्या लोकसभेची स्थापना होणे गरजेचे आहे. आंध्र प्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि ओदिशा या चार राज्यांमधील विधानसभांची मुदत जून महिन्यात संपत आहे. गेल्या वेळी लोकसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक १० मार्च रोजी जाहीर करण्यात आले होते आणि मतदान ११ एप्रिलपासून सात टप्प्यांमध्ये घेण्यात आले होते. तर मतमोजणी २३ मे रोजी करण्यात आली होती. या निवडणुकीत जवळपास ९७ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि त्यासाठी १२ लाख मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत, असे निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in