राहुल वायनाडसह अमेठीतून तर प्रियांका रायबरेलीतून लढणार?

काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा या रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
राहुल वायनाडसह अमेठीतून तर प्रियांका रायबरेलीतून लढणार?
(संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा या रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. 'रायबरेली की यही पुकार, प्रियांकाजी अब की बार' असा मजकूर असलेली पोस्टर्स शहरात झळकली असून त्यांच्या उमेदवारीबाबतची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी हे आपला विद्यमान मतदारसंघ वायनाडसह पुन्हा एकदा अमेठी मतदारसंघातून नशीब अजमावणार असल्याचा दावाही काँग्रेसचे स्थानिक नेते करीत आहेत.

रायबरेलीच्या विद्यमान खासदार सोनिया गांधी यांनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतल्यापासून प्रियांका गांधी-वढेरा यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू होती, त्यातच प्रियांकांचे पोस्टर्स झळकल्याने प्रियांका याच आता रायबरेलीतील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार असतील, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दरम्यान, राहुल गांधी हे वायनाडसह अमेठी या मतदारसंघातूनही निवडणूक लढविणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप सिंघल यांनी दिल्लीहून परतल्यावर सांगितले. त्यांचे नाव लवकरच जाहीर होईल, असेही ते म्हणाले. मात्र, याबाबत काँग्रेसच्या मध्यवर्ती नेतृत्वाकडून कोणतेही संकेत देण्यात आलेले नाहीत. पक्षाच्या मध्यवर्ती निवडणूक समितीची बैठक अद्याप झालेली नाही. राहुल गांधी यांनी २००२ ते २०१९ या कालावधीत अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. गेल्या निवडणुकीत त्यांचा भाजपच्या स्मृती इराणी यांनी अमेठी मतदारसंघात पराभव केला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in