लोकसभा निवडणूक : मोदी, शहा यांच्या समावेशाची शक्यता; भाजपची १०० उमेदवारांची यादी पुढील आठवड्यात?

लोकसभेच्या आगामी निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून पुढील महिन्यात जाहीर होणे अपेक्षित
लोकसभा निवडणूक : मोदी, शहा यांच्या समावेशाची शक्यता; भाजपची १०० उमेदवारांची यादी पुढील आठवड्यात?

नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून पुढील महिन्यात जाहीर होणे अपेक्षित असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील सत्तारूढ भाजप आपली १०० उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या पहिल्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नावांचा समावेश असेल अशी शक्यता एका वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने वर्तविली आहे.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक २९ फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता असून त्या बैठकीनंतर पहिली यादी जाहीर केली जाणार आहे. भाजपने ३७० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठरविले असून रालोआला ४०० जागा मिळण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलली जात आहेत.

निवडणूक प्रभारींशी नड्डा यांची चर्चा

नवी दिल्ली - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शनिवारी लोकसभेच्या निवडणुकीसाठी पक्षाने नियुक्त केलेल्या निवडणूक पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा आणि जनतेपर्यंत पोहोचण्याच्या कार्यक्रमांचा आढावा घेतला.

logo
marathi.freepressjournal.in