BMW ची 'लोकपाल'ना भूरळ; ७ गाड्यांच्या निविदा जारी

भ्रष्टाचारविरोधासाठी काम करणाऱ्या 'लोकपाल'ला लक्झरियस बीएमडब्ल्यू गाड्यांची भूरळ पडली आहे. या 'लोकपाल'नी ७० लाख रुपयांच्या सात बीएमडब्ल्यू गाड्यांसाठी ५ कोटी रुपयांच्या निविदा काढल्या आहेत.
BMW ची 'लोकपाल'ना भूरळ; ७ गाड्यांच्या निविदा जारी
Published on

नवी दिल्ली : भ्रष्टाचारविरोधासाठी काम करणाऱ्या 'लोकपाल'ला लक्झरियस बीएमडब्ल्यू गाड्यांची भूरळ पडली आहे. या 'लोकपाल'नी ७० लाख रुपयांच्या सात बीएमडब्ल्यू गाड्यांसाठी ५ कोटी रुपयांच्या निविदा काढल्या आहेत.

सध्या लोकपाल कार्यालयात अध्यक्षांसह एकूण सात सदस्य आहेत. 'भारताचे लोकपाल प्रतिष्ठित एजन्सीकडून सात बीएमडब्ल्यू '३ सीरिज ३३० एलआय' गाड्यांच्या पुरवठ्यासाठी निविदा मागवत आहेत. विशेष म्हणजे या गाड्यांसाठी 'एम स्पोर्ट' मॉडेल, 'लॉग व्हीलबेस' आणि पांढरा रंग अशी अट नमूद करण्यात आली आहे.

संकेत-बीएमडब्ल्यूच्या स्थळानुसार, ३ सीरिज लाँग व्हीलबेस ही आपल्या सेगमेंटमधील सर्वात लांब आणि प्रशस्त कार आहे, जी अत्यंत आलिशान केबिनमध्ये सर्वोच्च आरामासाठी तयार करण्यात आली आहे. ही कार आपल्या श्रेणीतली सर्वात शक्तिशाली आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज कार आहे," असे कंपनीच्या संकेतस्थळावर नमूद केले आहे.

निवड झालेल्या विक्रेत्याला 'लोकपाल'च्या चालकांसाठी आणि संबंधित कर्मचाऱ्यांसाठी बीएमडब्ल्यू वाहनांचे कार्यक्षम, सुरक्षित आणि प्रभावी संचालन सुनिश्चित करण्यासाठी सैद्धांतिक आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे बंधनकारक असेल, असे निविदेत म्हटले आहे. हे प्रशिक्षण किमान सात दिवसांचे असेल आणि वाहनांच्या डिलिव्हरीनंतर १५ दिवसांत पूर्ण केले जावे. प्रशिक्षणाचे वेळापत्रक लोकपाल कार्यालयाशी सल्लामसलत करून निश्चित केले जाईल,' असे दस्तावेजात नमूद आहे. निविदा सादर करण्याची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर आहे.

logo
marathi.freepressjournal.in